Kolhapur News: धक्कादायक! निवडणूक अधिकारी बनून आले अन् लाखोंना लुटलं, पुणे-बंगळुरू महामार्गावर नेमकं काय झालं?

Kolhapur Police: कोल्हापूरमध्ये व्यावसायिकाला २५ लाखांचा गंडा घातला. निवडणूक आयोगाचे तपासणी पथक असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे.
Kolhapur News: धक्कादायक! निवडणूक अधिकारी बनून आले अन् लाखोंना लुटलं, पुणे-बंगळुरू महामार्गावर नेमकं काय झालं?
Kolhapur CrimeSaam Tv
Published On

रणजित माजगावकर, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नकल करून बोगस पथकाने एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या तावडे हॉटेल उड्डाणपूलाजवळ घडला. याबाबत व्यावसायिक सुभाष हरणे यांनी कोल्हापूरच्या गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांची ५ पथके संशयितांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष हारणे या व्यावसायिकाला बोगस निवडणूक तपासणी पथकाने गंडा घातला आहे. सुभाष हारणे हे यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते सोमवारी झालेल्या व्यवसायाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारमधून तावडे हॉटेल इथे आले होते. दरम्यान २५ ते ३० वयोगटातील ५ जणांनी हारणे यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू आहे असे सांगितले. आमचे अधिकारी तुमच्या कारची झडती घेतील असे सांगून त्यांनी कारची तपासणी सुरू केली. यावेळी २५ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

Kolhapur News: धक्कादायक! निवडणूक अधिकारी बनून आले अन् लाखोंना लुटलं, पुणे-बंगळुरू महामार्गावर नेमकं काय झालं?
Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

आचारसंहिता काळात ऐवढी मोठी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही असे सांगून कारवाईची भीती घातली. त्यांनी आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबत वाडीच्या दिशेने गेले. तिथेच त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल काढून घेऊन हे अज्ञात पसार झालेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हारणे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. दरम्यान लुटमार करणारी बोगस अधिकाऱ्यांची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पोलिस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

Kolhapur News: धक्कादायक! निवडणूक अधिकारी बनून आले अन् लाखोंना लुटलं, पुणे-बंगळुरू महामार्गावर नेमकं काय झालं?
Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना हेच शिकवता? गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंचा पारा चढला, थेट कार्यलात जाब विचारला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com