संजय गडदे, मुंबई, साम टीव्ही प्रतिनिधी
shiv sena vs shiv sena, Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणूक आता ऐन रंगात आली आहे. प्रचार शिगेला पोहचला असतानाच मुंबईमध्ये जोरगार गोंधळ पाहायला मिळाला. ठाकरे आणि शिंदे यांचे समर्थक आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी आणि अंधेरी येथे दोन्ही शिवसेना भिडल्याचे समोर आले आहे. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरेंकडून कऱण्यात आला. त्याशिवाय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या. मुंबईमध्ये मध्यरात्री वातावरण चांगलेच तापल्याचे समजतेय.
मुंबईमध्ये कडाक्याच्या थंडीत राजकारण मात्र तापलेय. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला. जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाने केला. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना देखील मारहाण झाल्याचं समोर आलेय. ड्राय डे असताना मातोश्री क्लब मधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये साडेतीनशे जणांचा जमाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आल्याचं समजतेय. अंधेरी पश्चिमेकडील दुर्गा माता गावदेवी डोंगर भागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तूंचा टेम्पो येणार असल्याची चाहूल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शिवसैनिकांनी निवडणूक फ्लाईंग स्क्वाड आणि पोलिसांना पाचारण करून तक्रार करून आणलेल्या सर्व भेटवस्तू जप्त केल्या आहेत. मध्यरात्री साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास गावदेवी डोंगर परिसरात मतदारांना भेटवस्तू वाटण्यासाठी हा ट्रक आला होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला.
विधानसभा प्रचारात आता रंगत येऊ लागली आहे उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता दिंडोशी विधानसभा क्षेत्रात एकमेकांसमोर उभे टाकलेल्या शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये वाक युद्ध रंगले असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दहा वर्षात दिंडोशीकरांचे पिण्याचे पाणी सुनील प्रभू यांनी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत विकासकांच्या बांधकामासाठी वापरल्याचा आरोप करत संजय निरुपम यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना सुनील प्रभू म्हणाले. निरूपण यांना फक्त टीका करण्याचे काम उरले असून त्यांनी जर माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे दिले तर मी राजकारणातून संन्यास घेईल, हा सूर्य आणि हा जयद्रथ असे म्हणत आरोप सिद्ध करण्याचे आव्हान प्रभू यांनी निरुपम यांना दिले आहे. आता प्रभूंचे आव्हान निरूपम स्वीकारतात का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.