Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Maharashtra Election: अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्या एका कृतीनं पुन्हा मोठ्या वादात सापडलेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दानवेंच्या एका किकने गदारोळ उडालाय. पाहूया एका रिपोर्ट.
Raosaheb Danve : खरंच नेते म्हणायचं का?  फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ
Raosaheb DanveSaamtv
Published On

माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दानवे आहेत. मात्र अघळपघळ बोलणारे दानवे आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असतात.

आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत ते त्यांच्या वक्तव्याने नाहीतर एका जबरदस्त किकने. शिवसेनेचे शिंदे गटाचे जालना मतदारसंघातील उमेदवार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर भोकरदन येथे दानवे यांच्या घरी आले होते. तिथे स्वागताच्या फोटोत येणाऱ्या एका कार्यकर्त्याला दानवेंनी चक्क घोड्यासारखी लाथ मारुन बाजूला केलंय.

ऐन निवडणुकीत भाजप नेत्याच्या या कृत्यावर विरोधकांनी टीका केली नाही तर नवल...सहकाऱ्याला कसं वागवलं जातंय याचं हे लक्षण असल्याची टीका शरद पवारांनी केली. तर काँग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना सत्तेजा माज आल्याचा हल्लाबोल केलाय.

Raosaheb Danve : खरंच नेते म्हणायचं का?  फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ
Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आता दानवेंनी ज्याला लाथ मारली तोही त्यांचा खास जुना मित्र आहे. अगदी ३० वर्षांपासूनचा. त्याचं नाव आहे शेख अहमद. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांनं लगेच मित्रासाठी सारवासारव केली. रावसाहेब दानवे यांचा शर्ट गुंतलेला होता तो काढण्यासाठी मी गेलो होतो, असं शेख

Raosaheb Danve : खरंच नेते म्हणायचं का?  फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ
Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

नेते कार्यकर्त्यांच्या जीवावर असतात. कार्यकर्त्यांचा सन्मान केला नाहीत तर नेतेगिर लयास जाईल, असा सूर उमटतोय. काही वर्षांपूर्वीही दानवेंची जीभ घसरली होती. शेतकऱ्यांबद्दल शिवराळ भाषा वापरल्याबद्दल त्यांना दिलगीरी व्यक्त करावी लागली होती. आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दानवेंच्या या कीकवर विरोधक तुटून पडणार यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com