कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी; महामार्गावर अपघाताचा थरार

Tempo Carrying Kawad Yatra Devotees Overturns In Vaijapur: वैजापूर तालुक्यात लाडगाव–वांजरगाव रोडवर कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी झाला. टेम्पोमध्ये २० भाविक प्रवास करत होते. काही भाविक जखमी असून त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Kawad Yatra Devotees Tempo Accident In Vaijapur
Kawad Yatra Devotees Tempo Accident In Vaijapursaam tv
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर: वैजापूर तालुक्यात कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो पलटी होऊन अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास लाडगाव–वांजरगाव रोडवर घडली. या टेम्पोमध्ये तब्बल २० भाविक प्रवास करत होते. अपघातात काही भाविक जखमी झाले असून, त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Kawad Yatra Devotees Tempo Accident In Vaijapur
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावून चालक पसार, २ तास वाहतूक कोंडी; प्रवासी हैराण, पाहा VIDEO

वैजापूर तालुक्यातील वांजरगाव येथून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे असलेल्या पिनाकेश्वर अर्थात मोठा महादेव मंदिरासाठी दरवर्षी कावड यात्रा निघते. या यात्रेसाठी भाविक वांजरगावच्या दिशेने जात असताना लाडगाव–वांजरगाव रोडवर त्यांच्या टेम्पोचा अपघात झाला. यावेळी टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.

Kawad Yatra Devotees Tempo Accident In Vaijapur
Buldhana Accident: बोलेरोची दुचाकीला भयंकर धडक, बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू, बायकोने प्राण सोडले; बुलढाण्यात हळहळ

या अपघातात काही भाविकांना दुखापत झाली आहे. जखमींवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी भाविक हे कन्नड तालुक्यातील विटा औराळा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वीरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताची कारणे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com