Dombivali : प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू प्रकरण; केडीएमसीच्या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल, हलगर्जीपणा केल्याचा ठपका

Kalyan Dombivali News : केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल सुवर्णा सरोदे या महिलेचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. महिनाभरापूर्वी सदरची घटना घडली
Kalyan Dombivali News
Kalyan Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती नंतर उपचारा सुरु असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली होती. त्यानंतर आता दोघीविरोधात विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या सुवर्णा सरोदे (वय २३) या महिलेचा प्रसूतीनंतर अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. महिनाभरापूर्वी सदरची घटना घडली होती. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आंदोलन करत उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबधित डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Kalyan Dombivali News
Farmer Success Story : शुगर फ्री निळा बटाटा उत्पादन; मंचर येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

आंदोलनानंतर समिती गठीत  

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील केडीएमसीसह पोलिसांना निवेदन देत याप्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी; अशी मागणी केली होती. यानंतर सदर प्रकरणात चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या. यामधील केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने डॉ. संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या डॉक्टरांची सेवा खंडित केली होती. 

Kalyan Dombivali News
Badlapur : ब्लास्टिंगमुळे बदलापुर परिसरातील गावांना हादरे; घरांना गेले तडे, रहिवाशांनी आक्रमक होत दिला इशारा

अखेर गुन्हा दाखल 

दरम्यान या दोन्ही डॉक्टरांना आऊट सोर्सिंग पद्धतीवर कामावर घेण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी देखील डॉ. संगीता पाटील आणि डॉ. मीनाक्षी केंद्रे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही डॉक्टरांनी सुवर्णा सरोदे यांच्या प्रसूती दरम्यान उपचार करताना हलगर्जीपणा केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com