राजकीय धुसफुसीत ‘राखी’चा गोडवा! शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना बांधली राखी, चर्चांना उधाण

Ravindra Chavan Raksha Bandhan: स्थानिक राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत रक्षाबंधन सोहळ्यात वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.
Shiv Sena Women Leaders Tie Rakhi to Ravindra Chavan, Political Circles Take Notice
Shiv Sena Women Leaders Tie Rakhi to Ravindra Chavan, Political Circles Take Notice
Published On
Summary
  • रक्षाबंधनानिमित्त शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.

  • केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना राखी बांधली.

  • शिवसेना-भाजपमधील स्थानिक राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय

रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त कल्याण-डोंबिवली परिसरात विश्वासाचा आणि आपुलकीचा अनोखा ऋणानुबंध पाहायला मिळाला. शिवसेना महिला शहरप्रमुख केतकी पोवार यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची राखी पौर्णिमेनिमित्त भेट घेत राखी बांधली. शिवसेना-भाजपमधील स्थानिक पातळीवरील राजकीय तणाव आहे. फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान झालेल्या या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले, यामुळे चव्हाण यांच्या रक्षाबंधनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

Shiv Sena Women Leaders Tie Rakhi to Ravindra Chavan, Political Circles Take Notice
भेटीगाठींचं राजकारण, सतेज पाटील-भाजप नेत्यांच्या भेटीने समीकरणं बदलणार?

भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी हजारो भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात रक्षाबंधन सोहळा साजरा केला. कल्याण आणि डोंबिवली परिसरातील विविध भागांतून आलेल्या महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मायेने राखी बांधून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राखी बांधल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देत सामाजिक आणि विकासकामांबाबत चर्चा केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवत स्नेह आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न या भेटीतून झाल्याची चर्चा आहे.

रक्षाबंधनानिमित्त डोंबिवली आणि कल्याणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, तर दुपारी सम्राट चौक येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ महिलांसह शालेय आणि महाविद्यालयीन तरुणींचीही उपस्थिती होती. 'डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी'तील सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत चव्हाण यांना राख्या बांधल्या.

Shiv Sena Women Leaders Tie Rakhi to Ravindra Chavan, Political Circles Take Notice
मनोज जरांगे 'वर्षा'वर धडकणार; 40 लाख गाड्या, 6 कोटी मराठे मुंबईत येणार

भगिनींच्या स्वप्नांना बळ देण्याचा संकल्प: रवींद्र चव्हाण

या सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, "राखीच्या धाग्यात गुंफलेलं बहिणींचं निरागस प्रेम, हसरे चेहरे आणि डोळ्यांतील स्वप्ने पाहून आज प्रत्येक राखीने मनाला एक वेगळीच ऊब दिली आहे. चिमुकल्या हातांनी मनगटावर बांधलेली ही राखी मनात खोलवर रुजलीय. यातच या नात्याची खरी श्रीमंती अनुभवायला मिळाली."

Shiv Sena Women Leaders Tie Rakhi to Ravindra Chavan, Political Circles Take Notice
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

"यातील अनेक बहिणी वयाने लहान असल्या, तरी त्यांची स्वप्ने खूप मोठी आहेत. या सर्व भगिनींना आयुष्यात उंच भरारी घेता यावी, त्यांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता यावे आणि त्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल करावी, यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करणे हाच माझा आजचा संकल्प असल्याचं रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com