Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

Jalgaon News : जळगावच्या चोपडा तालुक्यात दोन महिन्यांच्या चिमुकलीला अज्ञात हिंस्त्र प्राण्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना. शेताजवळ अवशेष आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण.
Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?
Jalgaon News Saam Tv
Published On
Summary
  • जळगावच्या चोपडा तालुक्यात धक्कादायक घटना

  • दोन महिन्यांच्या मुलीला प्राण्याने उचलून नेले

  • शेताजवळ अवशेष आढळल्याने खळबळ

  • परिसरात भीती आणि वन विभागावर संताप

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या चोपडा तालुक्यातील मामलदे येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन महिन्यांच्या मुलीला हिंस्त्र प्राण्याने शिकार केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मामलदे गावाजवळील शेतात एक कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दोन महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब आनंदात होत. मात्र २ महिन्यांनंतर या आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?
Shocking : लुडो खेळताना चिमटा काढला, भावाला नाव सांगतो म्हणाली; दिराचा पारा चढला, वहिनीसोबत केलं भयंकर कृत्य

२ महिन्यांची मुलीला आईच्या कुशीत झोपलेली असताना रात्रीच्या वेळी एका अज्ञात हिंस्त्र प्राण्याने तिला उचलून नेल्याची घटना घडली. सकाळी मुलगी आईच्या कुशीत आणि इतरत्र घरात कुठेही दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. खूप शोधल्यानंतर शेताजवळ काही अंतरावर मुलीचे अवशेष आढळून आले.मात्र कोणत्या प्राण्याने तिच्यावर हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी तपास सुरु आहे.

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?
Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वारंवार बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडत असतानाही वन विभागाने योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे चोपडा तालुक्यात भीतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com