मैनपुरीत घरगुती वादातून हत्या
आरोपी हा कुटुंबातीलच सदस्य
पोलिसांनी आरोपीला अटक केली
कबुलीनंतर तपास अधिक गतीने सुरू
छोट्या वादातून मोठी दुर्घटना
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात दिराने वहिनीची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक म्हणजे संबंधित आरोपीने वहिनीला चिमटा काढला आणि तिने भावाला सांगू नये म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषभ (बदलेल नाव) हा मृत महिला पूजा (बदलेल नाव) हीचा नात्याने दीर लागतो. १० मार्च रोजी ऋषभ आणि पूजा दोघेही घरात लुडो खेळत होते. खेळताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणातून आरोपीने पूजाच्या मांडीला जोरात चिमटा काढला. या चिमट्याने पूजा कळवळली. तिला वेदना असह्य झाल्या.
पूजाने नवऱ्याला नाव सांगेन अशी धमकी ऋषभला दिली. या धमकीला घाबरून ऋषभने घरात कोणीही नसल्याची संधी साधून पूजाच्या खोलीत गेला आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर ऋषभ घटनास्थळावरुन फरार झाला. पूजाला मृत अवस्थेत पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागले. या पुराव्यांवरून पोलीस आरोपींपर्यंत सहज पोहचले आणि ऋषभच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान ऋषभने या हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.