खाद्यतेलाच्या दरात ३०० रुपयांची वाढ
नंदुरबारमध्ये दर २५०० रुपयांपर्यंत पोहोचले
आखाती युद्धाचा थेट परिणाम भारतीय बाजारावर
लग्नसराईत खर्चात वाढ
पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या महिन्याभरात १५ लिटरच्या खाद्यतेलाच्या डब्याचा दर तब्बल ३०० रुपये वाढ झाली असून २१०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीमुळे दैनंदिन वापरावर परिणाम होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची मागणी वाढलेली असते. मात्र, अशा वेळीच दरवाढ झाल्याने लग्न कार्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असून, आयोजकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांची खरेदी कमी होत असून, याचा परिणाम थेट तेल व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही होताना दिसत आहे.
आखाती देशांमध्ये महिनाभरापासून महायुद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूने रोखठोक प्रतिउत्तर मिळत आहे. मात्र आता अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध कधी थांबवणार? याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इराणसोबतचे युद्ध ९ एप्रिल २०२६ रोजी थांबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. इराणला दिलेले अल्टीमेटम संपण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत संकेत दिले आहे. तसेच ट्रम्प यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करणार असल्याचे सांगितले आहे.यामुळे युद्ध थांबण्याचे संकेत मिळाले आहे. दरम्यान या युद्धाचा थेट परिणाम भारतावरही झालेला पाहायला मिळाला. गॅस, पेट्रोल, आणि आता तेलाच्या किंमती वाढल्याने नागिरकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.