Raver News : मासेमारी करण्यासाठी गेले पण घरी परतलेच नाही; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Jalgaon News : नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी देखील ते मासेमारीसाठी सुकी नदीकाठी गेले होते. नेहमीची सवय आणि नदीतील पाण्याचा देखील अंदाज बिलराम याला होता. मात्र घटनेचा दिवशी त्यांचा अंदाज चुकला
Raver News
Raver NewsSaam tv
Published On

रावेर (जळगाव) : मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या इसमासोबत दुर्दैवी घटना घडली. सकाळी मासेमारी करण्यासाठी गेले असताना घरी न परतलेल्या इसमाचा कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र मासेमारी करत असताना इसमाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पाल येथील सुकी नदीत घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

जळगावच्या रावेर तालुक्यातील पाल येथील बिलराम केकड्या भिलाला (वय ४६) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. बिलराम भिलाला हे गावापासून जवळ असलेल्या सुकी नदीत रोज मासे पकडण्यासाठी जात होते. त्यानुसार नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी देखील ते मासेमारीसाठी सुकी नदीकाठी गेले होते. नेहमीची सवय आणि नदीतील पाण्याचा देखील अंदाज बिलराम याला होता. मात्र घटनेचा दिवशी त्यांचा अंदाज चुकला. 

Raver News
Vitthal Rukmini : विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाखाचा सोन्याचा तुळशीहार; यवतमाळच्या भाविकांकडून अर्पण

नदी काठी आढळले कपडे आणि साहित्य 

सकाळपासून मासे पकडण्यासाठी गेलेले बिलराम हे सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी शोध घेण्यास सुरवात केली. यावेळी कुटुंबियांना नदीकाठी त्यांचे कपडे, बूट, मासेमारीचे जाळे आणि साहित्य आढळून आले. तर आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असताना आढळून आले नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडवून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Raver News
Dhule News : पांझरा नदीत बुडालेल्या तरुणाचा अखेर लागला शोध; वार कुंडाणे शिवारात आढळून आला मृतदेह

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

दरम्यान शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी दुपारी बिलराम याचा मृतदेह सुकी नदीतील नागझरीजवळील चीप या खोल डोहात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाल चौकीचे पोलिस कर्मचारी जगदीश पाटील आणि कोतवाल अमीन तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com