Vitthal Rukmini : विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी १७ लाखाचा सोन्याचा तुळशीहार; यवतमाळच्या भाविकांकडून अर्पण

Pandharpur News : पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर आहे. वारकरी मंडळी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होणार आहेत. अनेक भाविक आषाढीच्या पार्श्वभूमीवर आतापासून पंढरपुरात येऊनदर्शन घेत आहेत
Vitthal Rukmini
Vitthal RukminiSaam tv
Published On

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अनेक भाविक सोन्या- चांदीचे दागिन्यांसह रोख रकमेस्वरूपात दान देत असतात. त्यानुसार आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे १७ लाख ६८ हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केला आहे.

पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर आहे. वारकरी मंडळी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होणार आहेत. तर अनेक भाविक हे आषाढीच्या पार्श्वभूमीवर आतापासून पंढरपुरात येऊन विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. तर आगामी काही दिवसात भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे. यासाठी मंदिर संस्थांकडून जय्यत तयारी सुरु आहे. 

Vitthal Rukmini
Badlapur : बदलापुरातील 'सत्संग विहार'ला महसूल विभागाचा दणका; उल्हास नदीतील भरावाप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

२३२ ग्रॅम वजनाचा तुळशीहार 

विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली असून दर्शन रांग देखील मोठी होत चालली आहे. तर काही भाविक दर्शनासाठी येत दागिने अर्पण करत आहेत. त्यानुसार यवतमाळ येथील भाविकांनी २३२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला असून, त्याची अंदाजे किंमत १७ लाख ६८ हजार रुपये इतकी होत आहे. मंदिर समितीच्या वतीने भाविकांचा सत्कार करण्यात आला.

Vitthal Rukmini
Amravati Crime : कॅफेच्या आड अश्लील चाळे; २०० रुपयात मिळतोय एक तास, दामिनी पथकाच्या कारवाईत १३ जण ताब्यात

पंढरपुरात दहा दिवस मांस विक्रीला बंदी
आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भावीण पंढरपूरमध्ये दर्शनसाठी येत असतात. यात्रा काळात मोठा उत्साह भाविकांमध्ये असतो. या अनुषन्गाने पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार यांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची असलेली मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण करून तसे आदेश प्रशासनामार्फत पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com