Girish Mahajan News : आता जनताच त्यांना मतदानातून उत्तर देतील; गिरीश महाजन यांचे संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर

Jalgaon News : लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदार संघासाठी भाजपचे उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे
Girish Mahajan
Girish MahajanSaam tv

जळगाव : नवनीत राणा या महिला उमेदवाराबद्दल संजय राऊत इतक्या आक्षेपार्य आणि घाण पद्धतीने बोलले की बोलू शकत नाही. (Jalgaon) त्यांनी फक्त आता शिव्या द्यायचं सोडले आहे..एवढ्या घान पद्धतीने ते बोलले. त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला तोंड खराब करायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. त्यांचा तोल ढासळत चालला असून आता लोकच त्यांना मतदानातून उत्तर देतील; अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत (Sanjay raut) यांच्या वक्तव्यावर दिली. (Breaking Marathi News)

Girish Mahajan
Leopard Attack : शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; शेतमजुरांची पळापळ

लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदार संघासाठी भाजपचे (BJP) उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. जळगाव जिल्ह्यात आज गर्दीचा आकडा असेल तो विक्रमी आणि रेकॉर्ड ब्रेक असेल, असेही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan
Nashik Crime : घर खाली करण्यासाठी बिल्डरकडून सुपारी; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून धमकावले, बिल्डरसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

खडसे प्रवेशाबाबत माझी परवानगीची गरज नाही 
एकनाथ खडसे मोठे व्यक्ती आहेत. यांनी स्वतः सांगितले आहे की, मी थेट नरेंद्र मोदी, अमित शहा, नड्डा यांच्याशीच बोलतो. त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही. रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकच कुटुंबातले आहे. त्यामुळे आपण जेष्ठ यांचे आशीर्वाद घेतो तसे रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या आशीर्वाद घेतले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com