Jalgaon Parola Accident
Jalgaon Parola AccidentSaam tv

Parola Accident: गावाकडे येण्यासाठी सुरतहून दुचाकीने प्रवास; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर

Jalgaon News : करंजी शिवारातील उड्डाणपुलावर अपघात होऊन दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांना पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास, चेहेऱ्यावर व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती
Published on

पारोळा (जळगाव) : देवपिप्री (ता. जामनेर) येथे पुतण्याकडे वास्तूशांतीच्या कार्यक्रम असल्याने सुरतहून (Jalgaon) गावाकडे दुचाकीने येताना अपघात झाला. या अपघातात (Accident) मुलाचा मृत्यू झाला आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे येथे उपचार सुरु आहेत. (Maharashtra News)

Jalgaon Parola Accident
Ahmednagar News: संगमनेर शहरात बिबट्याचा पाच तास मुक्त संचार; शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

जामनेर (Jamner) तालुक्यातील देवपिंप्री येथे वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्याने सुरतहून दुचाकीने पिता- पुत्र गावाकडे निघाले होते. मुलगा रोहन श्रावण भोई (वय २२) हा दुचाकी चालवत होता. तर मागे वडील श्रावण भोई बसले होते. दरम्यान करंजी शिवारातील उड्डाणपुलावर अपघात होऊन दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांना पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास, चेहेऱ्यावर व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून रोहन भोई याला मृत घोषित केले. तर श्रावण भोई हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Parola Accident
Buldhana News : आमदारांच्या दुकानावरची इंग्रजी पाटी अखेर काढली; लागणार मराठी फलक

गाव राहिले होते काही अंतरावर 

देवपिंप्री (ता. जामनेर) येथे २२ डिसेंबरला श्रावण भोई यांच्या पुतण्याकडे वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी सुरत (Surat) येथून पिता- पुत्र रात्री दुचाकीने निघाले होते. पारोळ्याजवळील करंजी गावाजवळ ही घटना घडली. त्यात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने देवपिंप्री गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत रोहन भोई याचा सुरत येथे हॉटेलचा व्यवसाय असून, तो कुटुंबासह वास्तव्यास होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com