Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam tv

TET Exam Scam: जळगाव जिल्‍ह्यातील १३८ बोगस शिक्षकांचे पगार बंद

जळगाव जिल्‍ह्यातील १३८ बोगस शिक्षकांचे पगार बंद
Published on

जळगाव : टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आला आहे. यात अपात्र परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे प्रकरण समोर आले असून यात सहभागी असलेल्या शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील असे १३८ शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले आहेत. (Jalgaon News TET Exam Scam)

Jalgaon ZP
जळगाव- पाचोरा तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी

टीईटी परीक्षेत गैरप्रकाराने (TET Exam Scam) उत्तीर्ण होऊन शाळांवर शिक्षक रूजू झाले आहेत. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकचे मिळून १३८ जण विविध शाळांवर (School) रुजू झाले होते. या सर्व शिक्षकांचे पगार बंद करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. तर अशा शिक्षकांचे पगार केल्यास शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत देखील शासनाने दिले आहेत.

माध्‍यमिकचे शिक्षक जास्‍त

अपात्र उमेदवारांची यादी मॅपिंगसाठी पाठविण्यात आली होती. अपात्र उमेदवारांपैकी ४४७ उमेदवार हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याचे समोर आले होते. यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे ६७ तर माध्यमिक विभागाच्या ७१ शिक्षकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com