जळगाव- पाचोरा तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी

जळगाव पाचोरा तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी
Jalgaon Railway News
Jalgaon Railway NewsSaam tv
Published On

जळगाव : जळगाव ते पाचोरा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या पाहणीसाठी पथक दाखल झाले. यात मुंबई (Mumbai) येथील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांतर्फे पाहणी करण्यात आली. (Jalgaon Pachora Third Railway Line)

Jalgaon Railway News
Jalgaon: घरकुल योजनेत कमी काम; दोन ग्रामसेवक निलंबित

भुसावळ ते जळगाव (Jalgaon) दरम्यान तिसरा लोहमार्ग पूर्ण करण्यात आला आहे. जळगाव-पाचोरा (Pachora) दरम्यान नदी-नाल्यांवरील पुलांसह तिसऱ्या लोहमार्गाचे काम अनेक ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. या तिसऱ्या लोहमार्गाच्या झालेल्या कामाचे परिक्षण करण्यासाठी मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांचे पथक भल्यापहाटेच (Bhusawal) भुसावळ येथे दाखल झाले होते. मध्य रेल्वेमार्गाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या पथकातर्फे गुरुवारी (ता. २५) भुसावळ ते माहेजी दरम्यान ६ विशेष मोटर ट्रॉलीव्दारे परिक्षण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव तसेच म्हसावद माहेजी दरम्यानच्या प्रत्येकी एक-एक किलोमिटर दरम्यान तसेच नदी-नाले पुलांचे देखील निरिक्षण करण्यात येऊन सूचना देण्यात आल्या. यावेळी मुंबई, भुसावळ मंडळासह रेल्वे (Railway) अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आज देणार अहवाल

भुसावळ ते मनमाड तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. हा मोठा प्रकल्प आहे. यामुळे रेल्वेला चारही ट्रॅकवर गाड्या चालवून प्रवासी व मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळविण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते मनमाड हा तिसरा रेल्वे मार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. भुसावळ ते जळगाव तिसरी रेल्वे लाईन पूर्ण झाली आहे. आता जळगाव ते पाचोरा दरम्यान काम सुरू होते. तेही आता पूर्ण झाले आहे. याची तपासणी करून मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री करण्यासाठी मुंबई, भुसावळचे वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी माहेजी गावापर्यंत रेल्वे मार्गाची तपासणी केली. आज (ता. २६) माहेजी ते पाचोरा दरम्यान मार्गाची तपासणी करून ते रेल्वेला अहवाल सादर करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com