जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याची अनुभूती आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. (Jalgaon) जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील तापमान (Temperature) आतापासूनच ४२ अंशाच्या वर पोहचले आहे. यामुळे जळगाव जिल्हा उन्हाने तापला असल्याची अनुभूती येण्यास सुरवात झाली आहे. (Latest marathi news)
यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार मागील तीन. चार दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात जळगाव शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. उन्हाच्या दाहकतेत नागरिक होळपळून (Jalgaon Temperature) निघत असून, नागरिक उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी दुपारच्यावेळी सावलीचा आधार घेत आहेत. अनेकजण आतापासूनच कुलर, ए.सी. बसवत आहेत. याशिवाय शीतपेयांच्या दुकानावर देखील गर्दी होत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्वच शहरात ४० पार
जळगाव जिल्ह्यातील १५ तालूक्यातील तापमान हे चार दिवसांपूर्वीच ४० अंशाच्या गेले आहे. दरम्यान दोन दिवसांपासून पॅरा ४२ अंशाच्या वर पोहचले असून जिल्ह्यातील चोपडा, चाळीसगाव, रावेर, यावल शहरातील तापमान ४१ अंशावर होते. तर उर्वरित शहरातील तापमान हे ४२ अंशाच्या वर गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.