Dharashiv News : दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा चाराही महागला; १०० पेंडीसाठी मोजावे लागताय इतके पैसे 

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या कडबा महागला आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा दुष्काळी परिस्थिती सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाईची संशय जाणवत असल्याने (dharashiv News) जनावरांना पाणी कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकरीसमोर आहे. दरम्यान या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठीचा चार देखील महागला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.  (Breaking Marathi News)

Dharashiv News
Nandurbar Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या कडबा महागला आहे. त्यामुळे दुध उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जनावरांना लागणाऱ्या कडब्याचे भाव चांगलेच वाढले असुन १०० पेंढी कडबा घेण्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एकीकडे दुधाळ पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. अर्थात दुधाळ (Animal) जनावरांना नुसती ढेप देणे देखील शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे ज्वारी व मक्याचा चार शेतकरी घेत असतो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dharashiv News
Dharashiv News : जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून चौकशी; लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पथके तैनात

ज्वारीपेक्षा चाऱ्याचा दर अधिक 

ऐकीकडे ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक असल्याचे बोलले जात असुन त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मुळात ज्वारीची लागवड आता जास्त केली जात नसल्याने यामुळे चाऱ्याची टंचाई जाणवत असते. परिणामी चाऱ्याचे दर दरवर्षी वाढत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com