जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदार संघात निवडणूक चुरशीची होणार आहे. मात्र एरंडोल- पारोळा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटांने लढवली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या मतदारसंघातील नाराज असलेल्या कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्यांसह ५० ते ६० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल- पारोळा मतदारसंघाची जागा अनेक वर्षांपासून शिवसेना लढवत आहे. मात्र या निवडणुकीत जागा शिवसेनेने न लढवता महाविकास आघाडीत (Mahavikas aaghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेली आहे. यामुळे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. यातूनच नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी सभापती तालुकाप्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुख यांच्यासह तब्बल पन्नास जणांचे राजीनामे आहेत.
महाजनांचा होता अपक्ष अर्ज
दरम्यान (NCP) राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा सुटल्याने या मतदारसंघात ठाकरे गटाचे नानाभाऊ महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी देखील माघार घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करत राजीनामे दिले आहेत. व्हाट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले आहेत. यामुळे या मतदारसंघात राजीनामे देणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी कोणाला पाठींबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मतदारसंघात मविआला धक्का
दरम्यान अनेक वर्षांपासून या ठिकाणी रक्ताचे पाणी केले. शिवसेनेने निवडणूक लढवली, मात्र यावेळी शिवसेनेला ही जागा मिळाली नाही. त्यामुळे राजीनामे देत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राजीनामे दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या राजीनामामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामामुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून महाविकास आघाडीचे उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.