Pune News : इच्छुकांनी भरले महापालिकेचे कोट्यवधी रुपये; महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा

Pune News ; विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अनेकांची निवडणूक लढविण्याची तयारी सुरु होती. त्यानुसार पुणे शहरात देखील सर्वच राजकीय पक्षातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

सचिन जाधव 
पुणे
: विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पुण्यात अनेक जण इच्छुक होते. महापालिकेची थकबाकी असल्यास अर्ज बाद होतो. त्यामुळे या इच्छुकांनी महापालिकेने मागणी न करताही सुमारे १५ कोटी रुपयांच्या कराचा भरणा केला आहे. यामुळे महापालिकेची थकबाकी देखील यानिमित्ताने जमा झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) बिगुल वाजल्यानंतर अनेकांची निवडणूक लढविण्याची तयारी सुरु होती. त्यानुसार पुणे शहरात देखील सर्वच राजकीय पक्षातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती. पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबई, दिल्लीपर्यंतच्या नेत्यांची गाठभेट घेऊन स्वतःचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न इच्छुकांनी केला. ही तयारी एकीकडे सुरु (Pune) असताना दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी कायदेशीर पूर्तता करणे आणि त्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करणे, संपत्तीचे विवरण याची माहिती अद्ययावत केली जात होती. तसेच उमेदवारांना महापालिका, महावितरण यासह अन्य शासकीय विभागांकडून ३४ ते ३५ प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागतात.

Pune News
Pimpri Vidhan Sabha : विरोधानंतर २० बंडखोर नगरसेवकांचा अण्णा बनसोडेंना पाठींबा

महापालिकेत भरले १५ कोटी 
पुण्यातील तसेच राज्यातील अनेक नेत्यांची पुण्यात घरे आहेत. व्यावसायिक इमारती, मोकळ्या जागा आहेत. त्यावर महापालिकेतर्फे कर लावला जातो. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून दीड दोन डझन राजकीय पदाधिकारी इच्छुक होते. थकित रक्कम भरल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. यातून महापालिकेला सुमारे १५ कोटी रुपये मिळाले आहेत. काही नेत्यांची थकबाकी ही कोट्यावधी रुपयांमध्ये होती. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीच त्यांचा खिसा रिकामा झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com