थरारक! शेतात बिबट्या शिरला, धाडसी शेतकरी बिनधास्त नडला; जीवाची बाजी लावून केलं जेरबंद

Farmer Fights Leopard And Survives In Jalgaon: बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे... अशातच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी एक शेतकऱी थेट बिबट्यालाच भिडलाय..शेतकऱ्याची बिबट्यासोबत थरारक झटापट कशी झाली ? पाहूयात या रिपोर्टमधून...
Injured farmer Mukesh Dongre after a fierce struggle with a leopard in Jalgaon.
Injured farmer Mukesh Dongre after a fierce struggle with a leopard in Jalgaon.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

अचानक बिबट्या समोर दिसताच भल्या भल्यांची पाचावर धारण बसते... मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये एका शेतकरी तरुणानं अंगावर शहारे आणणारं धाडस दाखवलंय. शहापूरचा रहिवासी असलेल्या मुकेश डोंगरे या शेतकऱ्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला. मात्र, मुकेशनं केवळ प्रतिकार केला नाही, तर त्यानं थेट मृत्यूलाच आव्हान दिलं. मुकेशनं जखमी अवस्थेतही आपल्या जिवाची बाजी लावत बिबट्याशी दोन हात केलेत. बिबट्यासोबतच्या जीवघेण्या झटापटीत मुकेश गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इतकंच नव्हे तर या पठठ्यानं चक्कं बिबट्याला पकडून वनविभागाच्या ताब्यातही दिलंय. त्यामुळे मुकेशचं सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. मुकेशच्या धाडसाचं मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून कौतुक केलंय. राज्यात सर्वत्र बिबट्याची दहशत पाहायला मिळत असताना वाघाचं काळीज असलेल्या मुकेशनं चक्क बिबट्याला भिडून त्याला पकडण्याची करामत केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com