संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव: सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक त्रास, पैशांचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून एरोंडल तालुक्यातील भातखेडा येथील गौरव ज्ञानेश्वर बडगुजर या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील एका तरुणाने सासरकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गौरव बडगुजर यांनी सासू, साली तसेच साडू यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी आणि धमक्या दिल्या जात असल्यामुळे मानसिक तणाव वाढल्याचेही या चिठ्ठीत लिहिले आहे.
या प्रकरणी मयत तरुणाच्या सासूसह तिघांविरुद्ध कासोदा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता बडगुजर (सासू), भटू गरुड (साडू) आणि गौरी गरुड (साली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त केली असून त्याआधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत कासोदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.