Shocking : ३५ वर्षीय IT इंजिनीयरची राहत्या घरी आत्महत्या;धक्कादायक कारण आलं समोर

Bengaluru IT Engineer’s Suicide : बेंगळुरूमध्ये सासरच्या छळाला कंटाळून ३५ वर्षीय आयटी इंजिनियर महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Shocking : ३५ वर्षीय IT इंजिनीयरची राहत्या घरी आत्महत्या;धक्कादायक कारण आलं समोर
Bengaluru IT Engineer’s SuicideSaam Tv
Published On
Summary
  • बेंगळुरूमध्ये ३५ वर्षीय आयटी इंजिनियर महिलेची आत्महत्या

  • सासरच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला

  • चार वर्षांचा मुलगा आईच्या मायेला पोरका झाला

Bengaluru IT Engineer’s Suicide Over Harresment बेंगळुरूमध्ये एका ३५ वर्षीय आयटी इंजिनियरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केलेल्या आरोपानुसार, सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव सुषमा असे आहे. मृत महिलेचे पाच वर्षांपूर्वी पुनीत कुमारशी लग्न झाले होते आणि या जोडप्याला चार वर्षांचा मुलगा आहे. घरात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत होते. मंगळवारी सुषमा आणि तिच्या सासू कल्पना यांच्यात जेवण बनवण्यावरून वाद झाला.

Shocking : ३५ वर्षीय IT इंजिनीयरची राहत्या घरी आत्महत्या;धक्कादायक कारण आलं समोर
Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

सुषमाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, तिची सासू तिला स्वयंपाक करू देत नव्हती आणि विविध मुद्द्यांवरून तिला त्रास देत होती. याशिवाय सुषमाच्या कुटुंबीयांनी हुंडा मागितल्याचाही आरोप केला आहे.

Shocking : ३५ वर्षीय IT इंजिनीयरची राहत्या घरी आत्महत्या;धक्कादायक कारण आलं समोर
Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

सासरच्या छळाला कंटाळलेल्या सुषमाने अखेर टोकाचं पाऊल उचललं. सुषमाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चार वर्षांचा मुलगा आईच्या मायेला पोरका झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com