Gulabrao Patil News: मंत्री गुलाबराव पाटलांना न्यायालयाचा दणका; अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठोठावला दंड

Jalgaon District Court Fined Gulabrao Patil: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.
jalgaon district court fined Eknath shinde Government minister gulabrao patil
jalgaon district court fined Eknath shinde Government minister gulabrao patil Saam TV
Published On

Jalgaon District Court Fined Gulabrao Patil: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणातील सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून गुलाबराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

jalgaon district court fined Eknath shinde Government minister gulabrao patil
Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्ते उठून गेले; गोरेगावमधील सभेचा VIDEO आला समोर

कोर्टाने ५०० रुपयांचा दंड आकारत गुलाबराव पाटलांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही कोर्टाने गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना दिली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

युती सरकारमध्ये मंत्री असताना एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसेंनी २०१६ मध्ये गुलाबराव पाटलांच्या विरोधात जळगाव (Jalgaon News) जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

jalgaon district court fined Eknath shinde Government minister gulabrao patil
NCP Protest In Maharashtra : '50 खोके एकदम ओके' राष्ट्रवादीकडून गद्दार आणि खोके दिवस आंदोलन, मुंबईत पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

या खटल्याची आता नव्याने सुनावणी सुरू झाली आहे.अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील सुनावणीला गैरहजर राहिले. त्यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता.

कोर्टाने ५०० रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला, तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही कोर्टाने दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com