Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्ते उठून गेले; गोरेगावमधील सभेचा VIDEO आला समोर

Eknath Shinde Goregaon Rally Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच अनेक कार्यकर्त्यांनी घरची वाट धरली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.
CM Eknath Shinde speech Goregaon Shiv Sena workers return to the home viral video
CM Eknath Shinde speech Goregaon Shiv Sena workers return to the home viral video Saam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Eknath Shinde Goregaon Rally Video: शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाचे गेट बंद केले. मात्र, तरी सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी घरची वाट धरली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde speech Goregaon Shiv Sena workers return to the home viral video
Devendra Fadanvis News: उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातले खरे गद्दार, फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, 'तुम्हाला गद्दार...'

आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडला. तर गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही नेत्यांचे भाषणं ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

CM शिंदे भाषणाला उभे राहताच कार्यकर्ते उठून गेले

एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांना टार्गेट केलं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकासकामांचे उदाहरण देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच अनेक कार्यकर्ते उठून गेल्याचं समोर आलं आहे.

CM Eknath Shinde speech Goregaon Shiv Sena workers return to the home viral video
Eknath Shinde Speech: आईची आठवण सांगताना मुख्यमंत्री शिंदे भावूक! म्हणाले, ती आमची चूक होती?

"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे म्हणजे गारद्यांची टोळी"

उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे म्हणजे गारद्यांची टोळी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गारदी शब्दाचा अर्थ माहित आहे का? गारदी म्हटल्यावर राघोबादादा, नारायणराव सगळे आठवतात. गारदी शब्दाचा अर्थ असा आहे, की पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करण्यासाठी अशा काही गारद्यांची टोळी तिकडे जमली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे.

"रिक्षावाल्याने ठाकरेंच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं"

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आधीचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन दोन पेन आहेत. मी रस्त्यावरही लोकांच्या कामासाठी सह्या केल्या. तुम्ही सरकार चालवायचं स़ोडवून गाडी चालवत होता. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नाहीत, त्या मी एक दिवसात केल्या. रिक्षावाल्याने ठाकरेंच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com