Shivsena Vardhapan Din Sohala: आज शिवसेनाच्या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचा) वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेप्रती असलेल्या समर्पणाची आठवण सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक झाले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, वयाच्या 21व्या वर्षी हा एकनाथ शिंदे बेळगावच्या जेलमध्ये 40 दिवस होता. कितीतरी केसेस झाल्या, अनेक वेळा जेल भोगले. मी भोगले माझ्यासोबतच्या नेत्यांनी भोगले, त्यामुळे शिवसेना मोठी झाली.
आई गेल्याची आठवण सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, मला आठवतंय, लोकसभेची निवडणूक होती. माझी आई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मला डॉक्टरचा फोन आला. मी जवाहरचा ब्रीज चढत होतो. डॉक्टरचा फोन आल्यावर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजुला लोकसभेचे उमेदवार गावित होते. त्यांनी मला सांगितले, येथे येथे येथे आपल्या सभा आहेत. मी म्हणालो किती वाजता संपतील. ते म्हणाले आठ नऊ वाजतील. (Breaking News)
कसं सांगू त्यांना माझी आई आता जगात नाही. मी त्यांना सांगितलं आपण सभा करून जाऊ. सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंतिम दर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही? ही माझी चूक होती? अनेक नेत्यांच्या जिवनात असे प्रसंग आले आहेत. अशा प्रसंगात बाळासाहेब आणि दिघे यांच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Latest Political News)
'मला दिघे साहेबांचा एक शब्द आठवतो....'
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मला दिघे साहेबांचा एक शब्द आठवतो. एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रु पुसायचे आहेत, तुला रडून चालणार नाही. ते शब्द आजही माझ्या कानात आहेत. अख्खा महाराष्ट्र मी माझा परिवार समजतो. माझे नेते माझे सहकारी हा माझा परिवार आहे. त्यामुळे मला जास्त वेळ काम करावं लागतं असेही एखनाथ शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.