Jalgaon Cyber Crime: क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवायचे सांगत फसवणुक

क्रेडीट कार्डचे लिमीट वाढवायचे सांगत फसवणुक
Jalgaon Cyber Crime
Jalgaon Cyber CrimeSaam tv
Published On: 

जळगाव : शिरसोली (ता.जळगाव) येथील खासगी व्यवसायीक तरुणाच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून (Cyber Crime) सायबर भामट्यांनी चक्क ३४ हजार६८० रुपयांचा चुना लावला. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon Cyber Crime
Solapur Accident News: रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला क्रेनची जोरदार धडक; जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

शिरसेाली (ता. जळगाव) येथील रहिवसी बी. एस. सोनार यांच्या मोबाईलवर दुपारी चार वाजता अज्ञाताचा फोन आला. त्याने मराठीत संभाषण करत आम्ही बँकेतून बोलत असून क्रेडीटकार्ड लिमीट वाढवण्याचे सांगत सोनार यांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला. आलेला ओटीपी सांगितल्यावर बँक खात्यातून काही क्षणातच ३४ हजार ५८० रुपये परस्पर डेबीट झाल्याचे निदर्षनास आले.

Jalgaon Cyber Crime
Solapur News: हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्‍या हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता

तत्काळ सोनार यांनी सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करुन तक्रार दिली. सायबर तज्ञांनी याप्रकरणी वायुगतीने पावले उचलत पे-टीएम या साईटवरुन होणारा हा व्यवहार थांबवण्या संदर्भात संबधीत कंपनीला सुचीत केले असून सोनार यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.