

सोलापूर : सोलापूरमधील सत्तर फूट रोड परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास क्रेनने जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत पादचारी वृद्धाचा जागीच मृत्यू झाला (Solapur) आहे. विश्वनाथ जाधव असे या वृद्धाचे नाव आहे. (Tajya Batmya)
सोलापूर शहरातील भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे विश्वनाथ जाधव (वय ५६) हे गृहस्थ सत्तर फूटी रस्ता ओलांडत होते. जाधव हे वयोवृद्ध असल्याने त्यांना जलद चालता येत नव्हते. यामुळे ते धिम्या गतीने रस्ता ओलांडत होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या क्रेनने जोराची धडक दिली. यामध्ये विश्वनाथ जाधव हे जागीच मयत झाले आहेत.
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
विश्वनाथ जाधव या वयोवृद्ध इसमास क्रेनने उडविले. यानंतर आजूबाजूच्या नागरीक मदतीसाठी धावले होते. मात्र ७० फुटी रोडवर घडलेल्या या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.