

मनोज जयस्वाल
वाशिम : पतीने पत्नी व दोन मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना (Washim) वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील ईचोरी येथे घडली होती. हल्ल्यात पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाले होते. तर मोठ्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू (Crime News) झाला होता. दरम्यान आता फरार आरोपी नंदू घोडकेचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)
आरोपी नंदू आत्माराम घोडके हा व्यसनी होता. त्यामुळे त्याचे वृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी जमीन त्याच्या नावावर न करता आपल्या दोन नातवांच्या नावावर केली होती. आत्माराम यांनी आरोपी नंदूचा मुलगा हरिओम घोडके व दुसरा वारसदार म्हणून मुलीच्या मुलाच्या नावे जमीन नोंदवली होती. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी व मुलाशी नेहमी वाद घालायचा. दरम्यान ६ जूनला संध्याकाळी असाच वाद झाला. त्यानंतर नंदूने रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा वाद घालत पत्नी रेखा घोडके, मुलगा हरिओम घोडके, लहान मुलगा महादेव घोडके यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. घटनेनंतर आरोपी नंदू आत्माराम घोडके हा फरार झाला होता.
याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या दोन महिला आरोपीना हल्ला करण्यासाठी मदतीला सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मुख्य आरोपी नंदू घोडके हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. आज त्याचा एका शेतात मृतदेह आढळून आला. काही खायला प्यायला न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आता आरोपी नंदू घोडके याचा मृत्यू झाल्याने आरोपीची संख्या दोनवर आली आहे. मात्र नेमक्या त्या दोन महिला कोण? हे आता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.