Nashik News: चेहेडी बंधाऱ्यात अंघोळीसाठी उतरले; दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

चेहेडी बंधाऱ्यात अंघोळीसाठी उतरले; दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तरबेज शेख

नाशिक : नाशिकरोड परिसरातील दारणा नदीवरील महापालिकेच्या (Nashik) चेहेडी बंधाऱ्यात सिन्नरफाटा (Sinnar) भागातील दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. (Breaking Marathi News)

Nashik News
Nandurbar News: टोचन यंत्राच्या साह्याने कापूस लागवड; मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात

चेहेडी येथील दारणा नदीला आवर्तन सुरु असून नाशिक महापालिकेच्या चेहेडी बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले आहे. शनिवारी (१० जून) दुपारी तीनच्या सुमारास चार युवक अंघोळीसाठी गेले होते. सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (वय १७), राहूल दीपक महानुभाव (वय १८), संतोष नामदेव मुकणे व आर्यन नंदू जगताप त्यातील दोघांनी बंधाऱ्यावरुन पाण्याच्या प्रवाहात पुर्वेच्या दिशेला उड्या मारल्‍या. अंघोळ करीत असतांना नदीच्या किनारी आले.

Nashik News
Cotton Bogus Seeds: तुळशी सिडस कापसाचे बनावट वाण पकडले; साडेनऊशे बॅग केल्या जप्त

प्रवाहातून निघताच आले नाही

सिद्धार्थ गांगुर्डे व राहूल महानुभाव हे दोघे (Fire Brigade) पुन्‍हा पाण्यात उतरले. परंतु, उलट्या प्रवाहात सापडल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्किल झाले होते. त्यांनी बाहेर निघण्यासाठी मदत मागितली. मात्र तोपर्यंत त्यांचा दम झाल्याने ते बुडाले. यानंतर दोन– तीन तासाने त्यांचे सहकारी संतोष मुकणे याने घरी येवून याबाबत सांगितले. त्यांनी त्वरीत आग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाचे रामदास काळे, राजेंद्र आहिरे, उमेश गोडसे, शिवाजी खुळगे, अशोक निलमणी, बाजाराव कापसे, राजेद्र खर्जुल, तानाजी भास्कर यांनी शोध मोहिम सुरु केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com