Solapur News: हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्‍या हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता

हिंदू - मुस्लिम ऐकतेचे प्रतिक असलेल्‍या हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On: 

सोलापूर : सोलापुरातील हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या हिंगुलांबिका मंदिरात वस्त्रसंहिता (Solapur) लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. (Maharashtra News)

Solapur News
Washim Crime News: पत्नी, दोन मुलांवर हल्‍ला करत फरार; आरोपी वडीलाचा आढळला मृतदेह

सोलापूरमधील १७ मंदिर वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी सहभागी झाली आहेत. तर राज्यातील १३२ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे. महाराष्ट्र (Tample) मंदिर महासंघाच्या या वस्त्रसंहितेला मंदिर समितीकडून मान्यता देण्यात आली असून अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय, असात्विक म्हणजेच फाटलेली जीन्स, स्कर्ट असे कपडे मंदिरात घालून नयेण्याच्या आशयाचे मंदिरात फलक लावण्यात आले आहेत.

Solapur News
Solapur Accident News: रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला क्रेनची जोरदार धडक; जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

फक्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कापड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल; असा आशय ही फलकावरती लिहिण्यात आला आहे. या अगोदर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या मंदिर परिसरात ही अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. मात्र, मंदिर समितीने या फलकाशी आपला संबंध नसल्याचे कारण देत फलक तात्काळ हालवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.