Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

Jalgaon Crime News: झोपेतच केला महिलेवर अत्‍याचार; जळगावातील धक्‍कादायक प्रकार

झोपेतच केला महिलेवर अत्‍याचार; जळगावातील धक्‍कादायक प्रकार
Published on

जळगाव : जळगाव शहरातील एका परिसरात दूधात गोळ्या देवून विवाहितेवर झोपेतच अत्याचार (Jalgaon News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस (Police) ठाण्यात एका जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

Jalgaon Crime News
Jalgaon News: अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, माफ करा..सुसाईड नोट लिहत संपविले जीवन

जळगाव शहरातील विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. जयदीप सुरेश पाटील याने ४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या दरम्यान वेळावेळी गरम दूधात गोळ्या टाकून ते दूध विवाहितेला दिले. त्यानंतर झोपेत विवाहितेसोबत शारिरीक संबंध प्रस्‍थापित केले. हा प्रकार जेव्हा विवाहितेला कळाला, तेव्हा जयदीप याने विवाहितेला तिच्या मुलाचा व पतीचा खून करण्याची धमकी दिली.

Jalgaon Crime News
Maharashtra Government: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू; शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेण्यात येणार?

दरम्यान जयदीप याने विवाहितेला मारहाण सुध्दा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घडल्या प्रकाराबाबत विवाहितेने मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन जयदीप पाटील याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com