Jalgaon News: अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, माफ करा..सुसाईड नोट लिहत संपविले जीवन

अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, माफ करा..सुसाईड नोट लिहत संपविले जीवन
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

भुसावळ (जळगाव) : मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, माफ करा.. असे सुसाईड नोटमध्‍ये नमूद करत (Bhusawal) भुसावळतील तरूणाने गळफास लावत जीवनयात्रा संपविली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Jalgaon News
Marathwada Farmer : मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; 3 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी उघडकीस

शहरातील गंगाराम प्लॉटमधील रहिवासी आयुष नीलेश राठोड (वय २१) या तरुणाने मंगळवारी (ता.४) सकाळी अकराला घराच्या बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला दोरीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पुणे येथे सीएस (कंपनी सेक्रेटरी) शिक्षण घेत असलेला आयुष निलेश राठोड हा भुसावळला आला होता. तो येथे बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी राठोड हा दहा वाजले तरी उठला नाही; म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या भावाने खिडकीचा काच फोडून आतील पडदा दूर केला असता आयुष राठोड याने छताला दोरी बांधून गळफास घेतला होता.

Jalgaon News
Nandurbar News : दोन गटातील दगडफेकीत पाेलिसही जखमी, 22 जणांवर गुन्हा दाखल; एसपींचे शांततेचे आवाहन

इंग्रजीतून सुसाईड नोट

याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला असता इंग्रजीत सुसाईड नोट लिहून ठेवलेली सापडून आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात राकेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी पुढील तपास करीत आहे. आयुष यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com