Nandurbar News : दोन गटातील दगडफेकीत पाेलिसही जखमी, 22 जणांवर गुन्हा दाखल; एसपींचे शांततेचे आवाहन

शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
nandurbar, police
nandurbar, policesaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar Crime News : नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दोन गटात तूफान दगडफेक झाली. यात मोटर सायकलची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान या घटनेनंतर पाेलिसांनी 22 जणांवर गुन्हा नाेंदविला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली. (Maharashtra News)

nandurbar, police
Pandharpur News : राष्ट्रवादीशी जवळीक असणारा कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याशी घेणार पंगा, फुंकले रणशिंग

ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर पाेलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यास प्रारंभ केला.

nandurbar, police
Rajkot To Mahbubnagar Train : राजकोट-मेहबूब नगर- राजकोट विशेष गाडी धावणार; अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेडकरांत चैतन्य

पाेलिसांनी सुमारे 15 ते 20 संशयितांना ताब्यात घेतले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी कडेकाेट पाेलिस बंदोबस्त ठेवला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नंदुरबार शहरात झालेल्या मारामारीनंतर एकूण बावीस संशयितांना अटक करण्यात आली आहे. काही संशयितांचा शाेध सुरु आहे. संशयितांवर आरोपींवर कलम ३०७, ३०८, ३५३,३३३,३३२,१४३,१४७,१४८,१४९, ४२७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

nandurbar, police
Nanded Crime News : गाेळीबारात बाॅयफ्रेंड जखमी, एकास अटक; एसपी काेकाटेंची माहिती

येणारे सण उत्सव लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सायबर सेलकडून सोशल मीडियावर देखील वाॅच ठेवले जाणार असल्याची माहिती एसपींनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com