Rajkot To Mahbubnagar Train : राजकोट-मेहबूब नगर- राजकोट विशेष गाडी धावणार; अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, नांदेडकरांत चैतन्य

प्रवाशांची मागणी पुर्ण झाली.
rajkot to mahbubnagar train
rajkot to mahbubnagar trainsaam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded News : गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवासी मागणी करीत असलेल्या राजकोट ते मेहबूब नगर (rajkot to mahbubnagar train) या रेल्वे गाडीस पश्चिम रेल्वे विभागाने हिरवा झेंडा दाखविला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. (Breaking Marathi News)

rajkot to mahbubnagar train
Jotiba Chaitra Yatra News : जोतिबा डोंगर फुलू लागला, सासनकाट्या नाचू लागल्या... चैत्र यात्रेसाठी 20 लाख भाविकांची शक्यता (पाहा व्हिडिओ)

पश्चिम रेल्वे विभागाने नुकताच राजकोट ते मेहबूब नगर ही विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार या गाडीच्या 24 फेऱ्या हाेतील. ही गाडी सोमवारी दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी राजकोट इथून सुटेल.

rajkot to mahbubnagar train
MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

अहमदाबाद, वडोदरा, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड मार्गे निझामाबाद, महेबुब नगर येथे मंगळवारी सकाळी सात वाजून 35 मिनिटाला पोहचेल. दरम्यान याच मार्गाने मंगळवारी महेबुब नगर इथून सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी गाडी सुटेल. राजकोट येथे गुरुवारी पहाटे पाच वाजता पोहचेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com