Jotiba Chaitra Yatra News : जोतिबा डोंगर फुलू लागला, सासनकाट्या नाचू लागल्या... चैत्र यात्रेसाठी 20 लाख भाविकांची शक्यता (पाहा व्हिडिओ)

मानाच्या सासनकाट्या या बैलगाड्यातून दाखल जोतिबा डोंगरावर दाखल हाेऊ लागल्या आहेत.
Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Kolhapur News
Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Kolhapur Newssaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Jotiba Chaitra Yatra News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर (Jotiba Dongar) जोरदार तयारी करण्यात आली आहे. मानाच्या सासनकाट्या या जोतिबा डोंगरावर दाखल झाले असून या यात्रेवर यंदा 145 सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह ड्रोनीची नजर राहणार आहे. यंदा २० लाखांच्या आसपास भाविक यात्रेसाठी दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Maharashtra News)

Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Kolhapur News
Shri Sant BaluMama Trust News : कोल्हापूरातील राड्यानंतर संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्‍यक्ष निवडीवर झाला महत्त्वपुर्ण निर्णय

जोतिबाच्या नावानं चांगभलं असं म्हणत गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. पाच एप्रिल हा या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. या निमित्त लाखो भाविक हे जोतिबा डोंगरावर दाखल होऊ लागले आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यां बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक चैत्र यात्रेला येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा वीस लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करत देवस्थान समितीने पूर्ण नियोजन केले आहे.

Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Kolhapur News
Covid 19 चा धाेका वाढला, साता-यानंतर महाराष्ट्रात मास्क सक्तीचं होणार?; आरोग्यमंत्री म्हणाले...

यंदा उन्हाचा तडाका मोठा असल्याने देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना सुलभ आणि गतिमान दर्शन मिळेल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त यात्रा काळात राहणार आहे. 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच ड्रोनची ही नजर या यात्रेवर राहणार आहे अशी व्यवस्थापक देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांनी दिली.

Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Kolhapur News
Market Committee Election News :सर्वांत माेठी बातमी; बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती, न्यायालयाचा आदेश

कोरोनाच्या संकटानंतर जोतिबाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असल्यामुळे देवस्थान समितीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे यंदा दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा जोरदार होणार हे निश्चित आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com