Shri Sant BaluMama Trust News : कोल्हापूरातील राड्यानंतर संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्‍यक्ष निवडीवर झाला महत्त्वपुर्ण निर्णय

कोल्हापुरात जो प्रकार घडला तो निदान बाळूमामाच्या देवालयात होऊ नये अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली हाेती.
balumama trust, kolhapur, Shri Sant BaluMama Trust
balumama trust, kolhapur, Shri Sant BaluMama Trustsaam tv

- रणजीत माजगावकर

Shri Sant BaluMama Trust : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्टची (Shri Sant Balumama Trust Latest News) आज (मंगळवार) गावात हाेणारी कार्याध्यक्षपदाची निवड रद्द झाली आहे. दरम्यान कालच्या गावातील घटनेच्या पार्श्वभुमीवर आजही आदमापूर (Admapur) येथे पाेलिसांचा बंदाेबस्त आहे. आज गावात निरव शांतता आहे. (Breaking Marathi News)

balumama trust, kolhapur, Shri Sant BaluMama Trust
Satara Covid-19 Update : दाेन कोरोनाबाधितांचा मृत्यू, सातारा जिल्हाधिकारी अलर्ट; बॅंक, शाळा, महाविद्यालयांसाठी महत्त्वाची बातमी (पाहा व्हिडिओ)

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षांचा मृत्‍यू झाल्याने या पदासाठी निवड करण्याचे निश्चिमत करण्यात आले हाेते. त्यासाठी देवालयाचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी स्वतःला कार्याध्यक्ष संबोधन इतर सर्व सदस्यांना सर्व विश्वस्तांना नोटीस पाठवली होती.

यासाठी कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी ट्रस्टमधील काही सदस्य आणि ग्रामस्थ साेमवारी कोल्हापुरात वकिलांची भेट घ्यायला गेले हाेते. तेथे धैर्यशील भोसले यांच्यासह इतर दहा ते बारा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आदमापुरचे सरपंच यांनी केला. या घटनेनंतर दाेन्ही गटाकडून एकमेकांविरोधात पाेलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

balumama trust, kolhapur, Shri Sant BaluMama Trust
Pandharpur News : राष्ट्रवादीशी जवळीक असणारा कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याशी घेणार पंगा, फुंकले रणशिंग

आज मंगळवार (४ मार्च) सकाळी ११ वाजता आदमापूर इथल्या देवालय परिसरात कार्याध्यक्षची निवड करण्यात येणार हाेती. मात्र ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. काल पासून गावात शांतता आहे. ट्रस्टी आणि सदस्य यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता इथून पुढे गाव एकवटणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान धर्मदाय आयुक्तांकडून जाऊन ही निवड प्रक्रिया होणार आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती गावातून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com