Maharashtra Government: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू; शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेण्यात येणार?

राज्य सरकारकडून राज्यमंत्री मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSAAM TV

सुशांत सावंत

Mumbai News : राज्य सरकारकडून राज्यमंत्री मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता सततच्या पावसाचे निकष निश्चित करण्याचा निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. तसेच नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे. (Latest Marathi News)

याचसोबत अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ होण्यासाठी अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन या पदांचे विषयांतर्गत व संस्थांतर्गत स्थानांतरण व रुपांतरण, अतिरिक्त पदे समर्पित करुन त्याऐवजी सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय देखील घेतला जाणार आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Marathwada Farmer : मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; 3 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी उघडकीस

आजच्या कॅबिनेटमध्ये आणखी काय निर्णय घेण्यात येणार?

सेलर इन्स्टीट्यूट "सागर" भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस फोर्ट महसूल विभागातील भूकर क्र. २ / ४ क्षेत्र ७४१३.१७ चौ.मी. या भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण करण्यास मंजूरी देण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

"विलंब अदायगी अधिभार व संबंधित बाबी (Late Payment Surcharge and Related Matters ) नियम २०२२" अंतर्गत महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई विकास योजना-२०३४ मधीलन. भू.क्र.१ (भाग), मौ. देवनार, देवनार डम्पिंग ग्राऊंड, गोवंडी, मुंबई या जमिनीवरील महापालिका शाळा (RE १.१) इतर शिक्षण (RE३.१), खेळाचे मैदान (ROS १.४), विदयार्थी बसतीगृह (RSA २.७) व उद्यान / बगीचा (ROS १.५) ही आरक्षणे वगळून भूखंड भरणी स्थळाचे नामनिर्देशानसह उद्यान / बगीचाचे आरक्षण (DMS ३.२ + ROS १.५) दर्शविणेबाबत प्रस्तावित फेरबदलास मान्यता देण्यात येणार आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Sushma Andhare On Fadnavis: 'झुकेगा नही घुसेगा साला' डायलॉग भारीच, पण तुमच्या घरात एक बाई घुसली... सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

अकृषि विद्यापीठातील आजीवन अध्यायन व विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतनसंरचना लागू करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com