Sushma Andhare On Fadnavis: 'झुकेगा नही घुसेगा साला' डायलॉग भारीच, पण तुमच्या घरात एक बाई घुसली... सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर निशाणा

Sushma Andhare Tweet: फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उत्तर देताना म्हटलं की, मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा.
Devendra Fadnavis-Sushma Andhare
Devendra Fadnavis-Sushma AndhareSaam TV

Mumbai News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस गृहमंत्री' म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उद्धव ठाकरेंवर अक्षरश: तुटून पडले. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना उत्तर देताना 'मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा' असं म्हटलं.

आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)  निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पाईंग करत होती, हे तुम्हाला 7 वर्षे कळले नाही. आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव.'

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही'; उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका

ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांनी पीडित रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं, की, राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.  (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंंनी काय म्हटलं होतं?

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांनी पीडित रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं, की, राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Devendra Fadnavis News : मी फडतूस नाही तर काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा; फडणवीस ठाकरेंवर तुटूनच पडले

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलं की, मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचितही सन्मान नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com