Uddhav Thackeray News : ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी पीडित महिला रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे. (Latest Marathi News)
रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'गेल्या आठवड्यात कोर्टाने नपुंसक हा शब्द वापरला होता. जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेचे हे ठाणे आहे. जे आता शिवसैनिक नाचतात, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. गुंड महिलांनी हल्ला केला'.
'माझ्या पोटात मारू नका, अशी रोशनी हात जोडून सांगत होत्या. राज्याला एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. मनात आणले तर यांना ठाण्यातून उखडून टाकू. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
'लाचार आणि बिनकामाच्या आयुक्तांचे निलंबन केले. गृहमंत्री लाचार नसतील तर त्यांनी कारवाई करावी. पोलीस आयुक्तांना निलंबित करा. असे लाचार पोलीस रक्षणकर्ते होऊ शकत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'पत्रकराला धमकी दिली जाते. आमच्यावर कमी टीका होते का, तेव्हा आम्ही काय लोकांना घरात घुसून मारतो का? फडणवीस यांना पदभार जमत नसेल तर राजीनामा द्यावा'.
'सरकारच नपुंसक म्हटल्यावर अपेक्षा काय करायची? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणाले, पुर्वीचं सुसंस्कृत ठाणे आता गुंडांचं ठाणे झाले आहे. ठाण्याची ओळख गुडांचं ठाणे अशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आम्ही शांत बसणार नाही. ठाण्यातील (Thane) गुंडागर्दी संपवणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
'महिला गुंडांकडून हल्ला करणारे नपुसंकच असतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच अशा फडतूस मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.