Uddhav Thackeray News: सरकारच नपुंसक म्हटल्यावर अपेक्षा काय करायची? कार्यकर्त्याला मारहाणीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray's Attack On CM Eknath shinde: ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Uddhav Thackeray's attack CM Eknath shinde
Uddhav Thackeray's attack CM Eknath shindeSAAM TV

Thane News : ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रोशनी शिंदे असे मारहाण करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याचे नाव आहे. मारहाण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरूआहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray's attack CM Eknath shinde
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही'; उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका

सरकारच नपुंसक म्हटल्यावर अपेक्षा काय करायची? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणाले, पुर्वीचं सुसंस्कृत ठाणे आता गुंडांचं ठाणे झाले आहे. ठाण्याची ओळख गुडांचं ठाणे अशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु आम्ही शांत बसणार नाही. ठाण्यातील गुंडागर्दी संपवणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महिला गुंडांकडून हल्ला करणारे नपुसंकच असतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच अशा फडतूस मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray's attack CM Eknath shinde
Covid-19 News: कोरोनाचा कहर पुन्हा सुरू; गेल्या २४ तासांत रुग्णांचा आकडा ३००० पार, ७ जणांचा बळी

सोमवारी ठाण्यातील कासारवडवली येथे ठाकरे गटाचा कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना संध्याकाळच्या0 सुमारास शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.

रोशनी शिंदे यांनी सांगितले की, मी शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करत आहे. पक्षाच्या प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युउत्तर दिलं. जे मी अर्जासोबत जोडलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com