Covid-19 In India : कोरोनाचा कहर पुन्हा सुरू; गेल्या २४ तासांत रुग्णांचा आकडा ३००० पार, ७ जणांचा बळी

देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २१,००० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
Corona VIrus
Corona VIrus Saam TV
Published On

Corona Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा वेगानं फैलाव होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड १९ (Covid-19) चे ३, ०३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्हिटी दरात मोठी वाढ झाली आहे.

देशात सध्याच्या घडीला कोरोना (Corona) चे २१,००० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ देशांत देशात ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने महाराष्ट्रात १, पंजाबमध्ये २, उत्तराखंडमध्ये १, जम्मूमध्ये १ आणि दिल्लीत २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, कोरोना रुग्णांची एकूण संध्या ४.४७ कोटींवर पोहोचली आहे.

Corona VIrus
Aditya Thackeray News: राज्यात गुंडागर्दी सुरू, गृहखाते ठाण्यातून चालते का? आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना खोचक सवाल

देशात सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांचा एकूण दर ०.०५ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९८.७६ टक्के आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४४, १७७, २०४ इतकी आहे. (Latest Marathi News)

कोरोनाने मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आलेले आहेत. देशात काही दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशवासियांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Corona VIrus
Dog Attack CCTV Footage : भटक्या कुत्र्यांकडून स्कुटीचा पाठलाग; मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या महिलेचा अपघात, थरारक व्हिडीओ

काय म्हणाल्या डॉ. भारती पवार?

देशात आणि राज्यात वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्या वाढवल्या आहेत. ऑक्सिजन बेड्स तसेच विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्यात, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com