Devendra Fadnavis News : मी फडतूस नाही तर काडतूस, झुकेगा नही तो घुसेगा; फडणवीस ठाकरेंवर तुटूनच पडले

Thackeray vs Fadnavis : 'एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती.
devendra fadnavis and uddhav thackeray
devendra fadnavis and uddhav thackeray saam tv
Published On

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाण्यात शिंदे गटातील महिलांनी ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. 'एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटपणा करणारा', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. (Maharashtra Political News)

devendra fadnavis and uddhav thackeray
Chandrakant Patil Exclusive : ...तर मी ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. फडतूस नाही, तर काडतूस आहे मी, झुकेगा नही तो घुसेगा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट आव्हानच दिलं आहे. नागपुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला. (Breaking Marathi News)

यावेळी भाजप नेत्यांनी जंगी सभा घेतली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचितही सन्मान नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर गौरव यात्रा तोपर्यंत सुरूच राहिल आणि सावरकरप्रेमी हे या लोकांचा निषेध करत राहतील.

devendra fadnavis and uddhav thackeray
Ashish Deshmukh News : काँग्रेस आशिष देशमुखांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

स्वातंत्र्यापूर्वी सावकरांना इंग्रजांनी त्रास दिला आणि स्वातंत्र्यानंतर इंग्रज आपले जे एजंट ठेवून गेले होते, त्या एजटांनी त्रास दिला. आजही त्यांचेच विचार घेऊन जे याठिकाणी वागता आहेत ते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे कळूच शकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. (Latest Marathi News)

यावेळी फडणवीसांनी भर सभेत तत्कालिन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे पत्रही वाचून दाखवले. अरे बाबा राहुल आमचं सोड आपल्या आजीचं ऐक, ज्यांचं नाव वापरतो त्यांचं तरी ऐक, असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) खडेबोल सुनावले.

"स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतुलनीय धैर्याने ब्रिटीश सरकारविरुद्ध केलेल्या क्रांतिकारी कार्याचे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अत्यंत गौरवपूर्ण स्थान आहे. भारतमातेच्या या अत्यंत श्रेष्ठ पुत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याचे जे आयोजन आपण करत आहात. त्याला मी सुयश चिंतेते", असं इंदिरा गांधीनी म्हटलं होतं असं फडणवीस म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com