Ashish Deshmukh News : काँग्रेस आशिष देशमुखांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Congress News : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्ष मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Ashish Deshmukh News
Ashish Deshmukh NewsSaam TV
Published On

Ashish Deshmukh News : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्ष मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. नुकतंच आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांनी माफी मागावी, असंही ते म्हणाले होते. हे वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या काँग्रेस शिस्त पालन समितीची बैठक होणार आहे. बैठकीत आशिष देशमुख यांनी केलेली वक्तव्य, त्यांची पक्षाविरोधात भूमिका याबाबत होणार चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Ashish Deshmukh News
Chandrakant Patil Exclusive : ...तर मी ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

नागपुरातील एक मोठा काँग्रेस नेता वारंवार पक्षाच्या नेतृत्वावर टीका करतो. पक्ष नेतृत्वालाच चुकीची वक्तव्य केल्याने त्यांनी माफी मागावी, असं म्हणतो. या प्रकारामुळे या काँग्रेस नेत्यावर काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Political News)

दुसरीकडे, आशिष देशमुखांची वक्तव्ये पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, त्यांना चांगल्या उपचाराची गरज असून ते त्यांनी लवकरात लवकर करुन घ्यावेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. जर कोणाला एखाद्या विषयावर काही वेगळे मत मांडायचे असेल तर त्यांनी ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले पाहिजे, असंही लोंढे म्हणाले.

Ashish Deshmukh News
Heart Attack Death : औषध विक्रेत्याला दुकानातच हार्ट अटॅक; अवघ्या ५ सेकंदातच झाला मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

प्रदेश काँग्रेसने (Congress) त्यांना ताकीद देऊनही त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. देशमुख यांना जनतेने नाकारलेले आहे, पक्ष वाढीसाठी ते कोणत्याच कार्यात सहभागी नसतात, त्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमासमोर पक्षविरोधी वक्तव्ये करुन लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा आटापीटा दिसतो. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याबद्ल योग्य तो निर्णय घेतील, असंही अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाविरोधात उभे ठाकलेले आशिष देशमुख काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले होते.त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षनेतृत्वाविरोधात का बोलता अशी विचारणा देशमुख यांना करण्यात आली. मात्र त्यांनी त्यासंदर्भात पत्र देऊनही त्याचे उत्तर दिले नसल्यामुळे आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी अटळ असल्याचे म्हटले जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com