Nanded Heart Attack Death Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. (Latest Marathi News)
अशीच एक घटना नांदेड (Nanded News) जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एका खाजगी रुग्णालयातील औषध दुकानात काम करताना औषध विक्रेत्याला हृदयविकराचा तीव्र झटका आला. यात त्याचा खुर्चीवरच मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकवणारी ही थरारक घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
शहरातील निर्मल हॉस्पिटल येथे ही घटना घडली. पवन तापाडिया (वय ४२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निर्मल हॉस्पिटल खाली तापडिया यांचे औषध दुकान आहे. (Breaking Marathi News)
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ते दुकानात आले. संगणकावर ते काम करत बसले. शेजारी त्यांचा सहकारी देखील होता. काम करत असताना पवन तापडिया यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. क्षणात्त ते खुर्ची वरुन कोसळले. त्याच्या सहकार्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वलसाड येथे असाच एक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसून आपल्या वडिलांसोबत गप्पा मारत होता. तेव्हा बोलता-बोलता तो अचानक (Heart Attack) दुचाकीसह जमिनीवर कोसळला. वडिलांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यापूर्वीच या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दीपक भंडारी (वय ५२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव होतं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.