Beed News : आई-वडील शेतात, घरी बारावीच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; ह्रदयद्रावक घटना

Beed Crime News : बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam TV

Beed Crime News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना जिल्ह्यातील कारी गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Beed Crime News
Crime News : सकाळी कोरी पाने सोडा, सायंकाळी सविस्तर उत्तरे लिहा; अजब परीक्षेचा गजब कारभार

वैष्णवी बापुराव फरताडे (वय १७ वर्ष) असे आत्महत्या (Crime News) केलेल्या मुलीचे नाव आहे. नुकतीच वैष्णवीची बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. परीक्षेनंतर वैष्णवी नैराश्यात होती. कुटुंबीयांनी तिचे समुपदेशन केले. मात्र, तरीही ती नैराश्यात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Beed Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar : घरातील हसरा चेहरा हरपला! उकळते पाणी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

दरम्यान, आई-वडील आणि भाऊ शेतात कामासाठी गेले असताना घरात (Beed News) एकटी असलेल्या वैष्णवीने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com