नवनीत तापडिया
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उकळलेले पाणी अंगावर पडून जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गंगापूर तालुक्यातील पुरी येथील प्रतिभा खंडागळे असे मृत्यू झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चिमुकली घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर उकळलेले कडक पाणी खाली घेत असतान अचानक कडक पाणी तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. (Latest Marathi News)
तिला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती, मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने तिला घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर (Gangapur) पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खंडागळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकमध्ये गरम तेलाच्या कढईत पडून चिमुकलीचा मृत्यू
गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षांच्या चिमुकलीचा भाजून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली आहे. वैष्णवी पवार असं मृत मुलीचं नाव आहे.
खाद्य पदार्थ विक्रेते समाधान निंबा पवार हे आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. दरम्यान त्यांचा स्वयंपाकाचं काम संपल्यानंतर त्यांनी गरम तेलाची कढाई खाली उतरून ठेवली.
एकीकडे ते कामात व्यस्त असताना त्यांची मुलगी वैष्णवी खेळता खेळता तोल जाऊन गरम असलेल्या तेलाच्या कढाईत जाऊन पडली. या घटनेत वैष्णवी गंभीररित्या भाजली होती. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.