Income Tax Raid In Nashik : नाशकात 14 ठिकाणी आयकर विभागाची धाड, राजकीय नेते अडचणीत येणार?

अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचे या बड्या रियल इस्टेट कंपन्यांशी आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
income tax department conduct raid in various parts of nashik
income tax department conduct raid in various parts of nashiksaam tv
Published On

Nashik News :

नाशिक जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी आयकर विभागाने (income tax department raid in nashik) एकाच वेळी 14 ठिकाणी धाडी (सर्च ऑपरेशन) टाकल्या. ही कारवाई नागपूर आयकर विभागातील (nagpur income tax department) 42 अधिकारी आणि 34 कर्मचारी यांच्या माध्यमातून केली जात आहे. (Maharashtra News)

प्राथमिक माहितीनूसार नाशिक शहरातील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी संबंधित कार्यालयांमध्ये चाैकशी करीत आहेत.

income tax department conduct raid in various parts of nashik
Ban On Onion Export : कांदा गडगडला ! शेतक-यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडला

अवघ्या दीड महिन्यापूर्वीच यातील तिघांवर जिएसटी विभागाने कारवाई केली हाेती. अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदार यांचे या बड्या रियल इस्टेट कंपन्यांशी आणि ठेकेदारांसोबत व्यावसायिक संबंध असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच या विविध कंपन्या या सरकारी ठेकेदार असल्याची चर्चा सुरु आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

income tax department conduct raid in various parts of nashik
Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर 11 गावांना जोडणारी नंदुरबारमधील बस सेवा सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com