Saam Impact : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर 11 गावांना जोडणारी नंदुरबारमधील बस सेवा सुरु

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आगार प्रमुखांना निवेदन दिले हाेते. त्याचे वृत्त देखील साम टीव्हीने बातमी प्रसारित केले. त्यानंतर बससेवा सुरळीत झाली.
msrtc bus resumes service in nandurbar
msrtc bus resumes service in nandurbarSaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News :

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) एका निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विशेषत: युवा वर्गास हाेणारा त्रास साम टीव्हीने नुकताच मांडला. त्याची दखल घेत एसटी महामंडळाने (msrtc) पुन्हा निर्णयात बदल करत प्रवाशांना दिलासा दिला. एसटी महामंडळाने निर्णय बदलल्याने ग्रामीण भागातील 11 गावांतील ग्रामस्थांनी साम टीव्हीचे आभार मानले. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यात अनेक भाग दुर्गम आहेत. नंदुरबार बस आगारातून पश्चिम भागातील गावांकडे जाणाऱ्या बस मार्गात नुकताच बदल करण्यात आलेला होता. यामुळे आदिवासी तरुणांसोबतच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

msrtc bus resumes service in nandurbar
Lonavala : लोणावळा पालिकेवर आरपीआयचा घंटानाद, मागण्यांच्या पुर्ततेसाठी 15 दिवसांचा अल्टीमेटम

ग्रामीण भागातील 11 गावांना जोडणाऱ्या बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना अधिकचं भाड देऊन खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत होता. याबाबतची बातमी साम टीव्हीने प्रसारित केली. त्याची दखल घेत आगार प्रमुखांनी ग्रामीण भागात जाणाऱ्या बस सेवा पूर्ववत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रश्नाबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (akhil bharatiya vidyarthi parishad) आगार प्रमुखांना निवेदन दिले हाेते. त्याचे वृत्त देखील साम टीव्हीने बातमी प्रसारित केले. दरम्यान बससेवा सुरळीत झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची आर्थिक परवड थांबल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नमूद करीत साम टीव्हीचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

msrtc bus resumes service in nandurbar
Success Story : आई-वडिलांच्या कष्टाचं मुलाने केले साेनं, 'खेलाे इंडिया' त राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर काेरलं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com