Chandrapur Tiger Attack : चंद्रपुरात वाघ लोकांच्या जीवावर का उठलेत? कारण आलं समोर

chandrapur tiger attack news : वाघांची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चाललीय... मानवी वस्तीत वाघांचा वावर आणि माणसाला निर्माण झालेल्या धोक्यामागे नेमकी काय कारणं आहेत? चंद्रपुरात वाघ लोकांच्या जीवावर का उठलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Tiger
Tiger attack Saam tv
Published On

चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी भागात सध्या वाघ आणि मानवामधील संघर्ष टोकाला पोहचलाय...गुंजेवाही भागात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्य हादरलंय. पण, चंद्रपुरातले वाघ अचानक एवढे हिंस्र का झालेत? असा प्रश्न उपस्थित केला जातोय..अशातच वन्यजीव तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केलाय...चंद्रपुरातली 47 अंशांची उष्णता आता वाघांच्या आक्रमकतेचं कारण ठरू लागलीय... ते कशी पाहूयात...

Tiger
वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू; महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक घटना

अतिउष्णतेमुळे वाघांमध्ये थर्मल स्ट्रेस वाढून त्यांच्या वर्तनात बदल होतोय. हायपरथर्मियामुळे वाघ अधिक चिडचिडे, अस्वस्थ आणि आक्रमक होतायेत. तसच पाण्याच्या शोधात आणि उष्णतेपासून बचावासाठी वाघ मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचं वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितलयं. त्यामुळेच वातावरणातील बदलांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होतोय...

Tiger
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू; वाघांच्या वाढत्या संख्येमुळे नवं संकट?

दरम्यान, वातावरणात होणारे हे बदल आगामी काळात मानवी वस्तीसाठी अधिक धोक्याचा इशारा देत आहेत. निसर्गाचा समतोल बिघडल्याने वाघ स्वतःचं नियंत्रण गमावून बसलाय. जोपर्यंत जंगलात प्राण्यांसाठी थंड निवारे आणि पाण्याचे पुरेसे स्रोत उन्हाळ्यात तयार केले जात नाहीत, तोपर्यंत वाघांची आक्रमकता कमी होणे कठीण आहे. त्यामुळे 47 अंशांची ही आग शांत कशी करायची आणि वाघांच्या या 'हायपर' आव्हानाचा मुकाबला कसा करायचा ? हेच आता वनविभागासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com