Solapur News: पोरी तुझ्या जिद्दीला सलाम! अ‍ॅम्ब्युलन्सने परीक्षा केंद्र गाठलं; नाकाला ऑक्सिजन, हाताला सलाईन असताना दिला बारावीचा पेपर

प्रेरणा बाबर असं या मुलीचं नाव आहेत.
Prerna Babar
Prerna BabarSaam TV
Published On: 

सोलापूर : आजारी असल्याची पर्वा न करता एक विद्यार्थिंनी अॅम्बुलन्समधून थेट परीक्षा केंद्रावर पोहोचली. सलाईन लावलेल्या अवस्थेत या विद्यार्थिनीने आपला बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर दिला आहे. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात या विद्यार्थिनीने तिचा पेपर दिला आहे. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Solapur News)

प्रेरणा बाबर असं या मुलीचं नाव आहेत. आजारपणामुळे प्रेरणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र बारावीचा पेपर राहून जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र प्रेरणाने जिद्द सोडली नाही. नाकाला ऑक्सिजन आणि हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत तिने परीक्षा दिली.

Prerna Babar
Wardha News: मोठी बातमी! खोदकाम सुरू असताना विहिर खचली, दोन मजुरांची मृत्यूशी झूंज सुरू; बचावकार्याला सुरूवात

महाविद्यालयात अचानक ॲम्बुलन्स आल्याने नेमका हा काय प्रकार आहे हे परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे थोड्या वेळ विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र केंद्र संचालक यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना ॲम्बुलन्स कशासाठी आली आहे याबाबत कल्पना दिली.

Prerna Babar
Maharashtra Politics : संजय राऊत बोलले, विरोधक उद्धव ठाकरेंवर घसरले; म्हणाले, किमान FB लाइव्ह करून तरी...

पेपर सुरु असतानाही प्रेरणावर उपचार चालू होते. पेपर संपल्यानंतर पुन्हा राजश्री पाटील हिला उपचारासाठी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रेरणाने आजारी अवस्थेतही परीक्षा देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Edited By - Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.